Pune Corona News: सक्रिय रुग्णाचं प्रमाण होतंय कमी; शहरात सोमवारी १६७ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:34 PM2021-09-27T21:34:06+5:302021-09-27T21:37:56+5:30

आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९३७ संशयितांची तपासणी करण्यात आली

The proportion of active patients is low 167 people released from corona in the city on Monday | Pune Corona News: सक्रिय रुग्णाचं प्रमाण होतंय कमी; शहरात सोमवारी १६७ जण कोरोनामुक्त

Pune Corona News: सक्रिय रुग्णाचं प्रमाण होतंय कमी; शहरात सोमवारी १६७ जण कोरोनामुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात सक्रिय रूग्ण संख्या १ हजार ४१३आतापर्यंत ४ लाख ९० हजार ५९ जण कोरोनामुक्त

पुणे: शहरात सोमवारी १०९ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९३७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८३ टक्के इतकी आढळून आली आहे.

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या १ हजार ४१३ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १८२ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २२७ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३३ लाख ४५ हजार ६६९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४९४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९० हजार ५९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: The proportion of active patients is low 167 people released from corona in the city on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.