सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ८३९ एकर जमिनीचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:10+5:302021-06-05T04:09:10+5:30
पुणे : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीसाठी कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी २ ते १० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित ...
पुणे : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीसाठी कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी २ ते १० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी महावितरणाकडून ३ ते ५० एकरांपर्यंत जागा भाडेतत्वावर घेण्यात येत असून, पुणे प्रादेशिक विभागात या प्रकल्पांसाठी आतापर्यंत ५५ अर्जांद्वारे ८३९ एकर जमिनींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, सहकारी संस्था तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध संस्था, कंपन्या, महामंडळ, यांच्या मालकीच्या जमिनी २७ ते ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणाकडून प्रतिएकर ३० हजार रुपये वार्षिक भाडेपट्टी व दरवर्षी यात ३ टक्के वाढ देण्यात येणार असल्याची माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली आहे.
आतापर्यंत या प्रकल्पांसाठी पुणे प्रादेशिक विभागात सोलापूर जिल्हा- ३४ अर्जांद्वारे ४३४ एकर, कोल्हापूर- ४ अर्जांद्वारे १६१ एकर, सातारा- ४ अर्जांद्वारे १०७ एकर, पुणे जिल्ह्यातून १० अर्जांद्वारे ८७ एकर जमिनीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांवर महावितरणाकडून कार्यवाही सुरु आहे. या प्रकल्पांसाठी अधिकाधिक जमीन मिळविण्यासाठी महावितरणने आवाहन केले असून, अधिक माहिती संबंधित जमीनमालकांना ँ३३स्र२://ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल/२ङ्म’ं१-े२‘५८/्रल्लीि७_े१.ँ३े’ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही महावितरणने सांगितले आहे.
-------------------