पोलीस शिपायांना अधिकारी बनविण्यासाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:27+5:302021-07-03T04:08:27+5:30
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोलपंप उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक ...
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोलपंप उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय लवकर घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक पोलीस शिपायांना अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, कोरोना संसर्गातही पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांकडून उल्लेखनीय काम केले जात आहे. आव्हानात्मक स्थितीत काम करावे लागत आहे. मात्र, तरीही पोलीस रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.
--------------------------------------
मंत्रालयात होणार बैठक
पोलीस शिपायांना उपनिरीक्षकापर्यंत पोहोचता यावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेळ देण्याची मागणी केली. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रालयात बैठक घेऊन प्रस्तावावर विचारविनिमय करून निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांना दिली आहे.
--------------------------