वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:21+5:302021-07-03T04:08:21+5:30
पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात हजारो डॉक्टर प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, सध्या कोरोनामुळे ते बंद आहेत. ...
पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात हजारो डॉक्टर प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, सध्या कोरोनामुळे ते बंद आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून देणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, कोरोना महामारीमुळे सध्या वैद्यकीय क्षेत्रावर प्रचंड ताण आहे. त्यामुळे यापुढे प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याला लागणार आहे. त्यादृष्टीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावेत, यासाठी निर्णय होईल. तसेच शिकवणी सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे दोन्ही लसीकरणाचे डोस झालेले असावे, असा नियम करणार आहे.
यूपीएससी/एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
----