देगांवची समृध्दी ठरली भाेरमधील सर्वात तरुण सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:05 AM2021-01-24T04:05:04+5:302021-01-24T04:05:04+5:30
सात सदस्य जागा असलेल्या देगांव ( ता.भोर ) ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिवसैनिक अंकुश सावंत यांची कन्या समृद्धी सावंतची वार्ड १ ...
सात सदस्य जागा असलेल्या देगांव ( ता.भोर ) ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिवसैनिक अंकुश सावंत यांची कन्या समृद्धी सावंतची वार्ड १ मध्ये दिग्गज असलेल्या रत्नाबाई यादव व रंजना श्रीरंग यादव यांच्या विरोधात लढत झाली. यात समृद्धी १९१ मते मिळवून विजयी झाली. पराभूत रत्नाबाई यादव यांना १६२ मते तर रंजना यादव यांना ५१ मते मिळाली.
भैरवनाथ विकास पॅनल विरुद्ध जनसेवा महाविकास आघाडी लढत झाली यात जनसेवाचे चार उमेदवार विजयी झाले असून वार्ड दोनमधून शिवाजी पंढरीनाथ यादव ९६, वार्ड तीनमधून मंजूषा सुशील शेलार १३३ व आझम मुलानी १४१ मतांनी विजयी झाले आहे.पॅनलप्रमुख तुळशीराम सावंत अशोक शेलार, अंकुश सावंत, काका मोहीते, राहूल फणसे, बबू यादव, सोनू यादव यांनी काम पाहिले.
गावामध्ये महिला सक्षमीकरण करून विकासकामे करणार असल्याने समृद्धी सावंतने सांगितले.
२३ भोर समृद्धी