मसाला पिकातून आणली शेतीत समृद्धी

By admin | Published: October 24, 2016 01:13 AM2016-10-24T01:13:09+5:302016-10-24T01:13:09+5:30

थील एका पदवीधर युवकाने आपल्या गावातीलच रांजणगावच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामवंत देशी व परदेशी कंपन्यांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही

Prosperity in farming brought out from seasoning crops | मसाला पिकातून आणली शेतीत समृद्धी

मसाला पिकातून आणली शेतीत समृद्धी

Next

संजय देशमुख, रांजणगाव गणपती
थील एका पदवीधर युवकाने आपल्या गावातीलच रांजणगावच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामवंत देशी व परदेशी कंपन्यांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक पिके सोडून आधुनिक तत्रंज्ञानाच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग केले. आल्याचे मसाला पीक घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने शेती समृद्ध केली आहे.
महेंद्र नामदेव साळुंके असे या हरहुन्नरी युवा शेतकऱ्याचे नाव असून, आपल्या पदवी शिक्षणाची किंचितही लाज न बाळगता त्यांनी पुणे-नगर महामार्गाला लागूनच असलेल्या आपल्या ३० गुंठे क्षेत्रात मसाला पिकात गणना होणाऱ्या आल्याचे पीक घेऊन परिसरात एक आगळेवेगळे पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यासाठी त्यांना आई मंदाबाई तसेच मित्र परिवाराचीही उत्तम साथ लाभली.
नारायणगाव येथून स्थानिक जातीचे ४०० किलो आल्याचे खात्रीशीर निरोगी व रसरशीत बेणे विकत आणले. साधारणपणे महिना ते दीड महिनाभर हे बेणे जमिनीवर सावलीत ढीग करून ठेवले व त्यावर बारदानाने आच्छादन केले. नंतर दररोज पाणी शिंपडून बारदान ओले राहील, याची दक्षता घेतली. दरम्यानच्या काळात आले पिकाला मध्यम प्रतीची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व भुसभुशीत जमीन आवश्यक असल्याने जमीन चांगली खोलवर नांगरून, कुळवून भुसभशीत केली. त्यात ६ ट्रॉली शेणखत टाकून चार फुटांवर सरी पाडली. लागवडीच्या वेळी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व पालाशयुक्त वरखते दिली. वरंब्यावर २० सें.मी. अंतरावर ढीग करून ठेवलेल्या आल्याच्या बेण्यातून क ोंब आलेले २ ते ३ डोळे असलेल्या कंदाचे २५ ग्रॅम वजनाचे तुकडे करून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यात आली. लागवडीपूर्वी रोग व किडीपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी कंदाचे तुकडे बुरशीनाशकात बुडवून घेतले. पिकाला पाणी तसेच प्रवाही द्रवरूप खते देण्यासाठी वरंब्यावर ठिबक सिंचन संचाची व्यवस्था केली. पीक महिन्याचे झाल्यावर हलकीशी खुरपणी करून तण काढले. नंतर ४ महिन्यांनी तण काढून कंदाला मातीची भर दिली. साधारणपणे चांगला बाजारभाव असल्यास ६ महिन्यांनंतर आल्याचे पीक काढता येते; मात्र बाजारभाव नसल्यास ते पीक तसेच जमिनीत ठेवल्यास कंद पोसून उत्पन्नात भर पडते. आल्यापासून सुंठ तयार करण्याबरोबरच दररोजच्या आहारात, मसाला पदार्थ, औषधे, आलेपाक तसेच संस्करण प्रक्रिया उद्योगात आल्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

Web Title: Prosperity in farming brought out from seasoning crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.