वेश्या व्यवसाय करणा-या देवदासी येणार ऑन रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 11:11 AM2019-02-01T11:11:04+5:302019-02-01T11:18:49+5:30

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत असेल तर तिची ओळख देखील यातून स्पष्ट होईल.

Prostitute womens come on record of police | वेश्या व्यवसाय करणा-या देवदासी येणार ऑन रेकॉर्ड

वेश्या व्यवसाय करणा-या देवदासी येणार ऑन रेकॉर्ड

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची होणार नोंदणी  गैरप्रकार थांबविण्यासाठी फरासखाना पोलिसांची मोहिम गुन्हेगारी प्रवृत्ती, व्यसनी व्यक्ती रात्रीच्या वेळी याठिकाणी येवून धिंगाणा घालत असल्याचे प्रकार

सनील गाडेकर  
पुणे : बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणा-या प्रत्येक महिलेची पोलिसांकडे माहिती असावी, तसेच येथील गुन्हेगारी कमी होवून अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो का? याची चाचपणी करण्यासाठी पेठेतील सर्व देवदासांची वैयक्तिक माहिती व कागदपत्रे घेवून त्यांची नोंद ठेवली जाणार आहे.  
परिसरातील गुन्हेगारांचा वावर रोखण्यासाठी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिसांच्यावतीने विशेष मोहिम हातीत घेण्यात आली. अल्पवयीन मुलींकडून करून घेण्यात येणारा वेश्याव्यवसाय थांबवणे आणि येथील बेकायदेशीर व्यवसांना आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आत्तापर्यंत सुमारे २ हजार देवदासींची नोंदणी करण्यात आली आहे. या कामासाठी दोन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून त्या प्रत्येक इमारतीमध्ये जावून तेथे राहत असलेल्या महिलांचे ओळखपत्र, फोटो, पत्ता आणि मोबाइल नंबर अशी माहिती नोंदवत आहे. तर काहींना पोलीस चौकीत येवून स्वत:ची माहिती दिली आहे. 
या नोंदणीमुळे या ठिकाणी नेमक्या किती महिला वास्तव्यास आहे, याची माहिती मिळेल. तसेच अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत असेल तरी ओळख देखील यातून स्पष्ट होईल. एखाद्या मुलीच्या बाबतीत काही गैरप्रकार झाला तर त्याच्या विषयी लवकर माहिती मिळत नाही. अशा वेळी तिची ओळख पटविणे अवघट असते. यामुळे त्यांची माहिती ठेवण्यात येत आहे. त्यातून त्यांच्यात देखील सुरक्षेची भावना निर्माण होईल, अशी माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली. 
 गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि व्यसनी व्यक्ती रात्रीच्या वेळी याठिकाणी येवून धिंगाणा लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी १ जानेवारीपासून रात्री ११ नंतर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यातून येथील गैरप्रकार काहीसे कमी झाले असून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी झाला आहे. 
......................
गुन्हेगारांचा असतो वावर 
बुधवार पेठेत सुमारे ४०० कुंटणखाणे आहेत, यामध्ये सुमारत पाच ते सहा हजार महिला वेश्याव्यवसाय करतात. परिसरात गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. अनेकदा काही गुन्हेगार गुन्हा केल्यावर येथे लपून बसतात. तर वेश्याव्यवसाय व पैशाच्या देवाण घेवाणीतून येथे वाद होत असताना. नागरिकांना लूबाडण्याच्या तक्रारीही पोलिसांकडे येतात. या पार्श्वभूमीवर हा ड्राईव्ह घेण्यात आल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली.  
............................
परदेशी महिलांच्या घुसखोरीला लगाम : 
वेश्या व्यावसाय करण्यास परदेशी महिलांना देखील या परिसरात आणले जाते. त्याच्यासाठी खास व्यवस्था देखील केली जात होती. मात्र सर्वांची नोंदणी ठेवल्यामुळे या महिलांच्या घुसखोरीला लगाम लागणार आहे. नाकाबंदीमुळे येथील काही गैरप्रकारांना आळा देखील बसला आहे. 

Web Title: Prostitute womens come on record of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.