देहविक्रय करणा-या महिला अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:42+5:302021-03-04T04:15:42+5:30

पुणे : कोव्हिड आणि लॉकडाऊनमुळे जगणे अवघड झालेल्या देहविक्रय करणा-या महिलांसाठी राज्य शासनाने मदत योजना जाहीर केली. परंतु ...

Prostitutes still deprived of government assistance! | देहविक्रय करणा-या महिला अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित !

देहविक्रय करणा-या महिला अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित !

googlenewsNext

पुणे : कोव्हिड आणि लॉकडाऊनमुळे जगणे अवघड झालेल्या देहविक्रय करणा-या महिलांसाठी राज्य शासनाने मदत योजना जाहीर केली. परंतु अनेक महिलांचे बँकेत खाते आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्यामुळे निधी मंजूर होऊनही महिलांपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब लागत आहे. प्रत्यक्ष मदतीची घोषणा आणि जमिनीवरचे वास्तव यामध्ये तफावत आढळत येत असून, इतर शासकीय योजनेप्रमाणेच या सम्पूर्ण प्रक्रियेतही पारदर्शकतेचा अभाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही महिला मदतीच्या हक्कापासून वंचित राहिल्या असल्याची बाब समोर आली आहे.

उद्या (दि.3) आंतरराष्ट्रीय वेश्या हक्क दिवस आहे. या मार्च अखेरीस सरकारचे आर्थिक वर्ष संपत आहे. इतर शासकीय योजनांप्रमाणे ही योजना देखील लालफितीमध्ये अडकू नये अशी अपेक्षा

नँशनल नेटवर्क आॅफ सेक्स वर्कर्स संस्थेच्या अध्यक्षा किरण देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने मुख्यमंत्री आपत्कालीन निधीमधून 51.18 कोटी रूपयांचे अनुदान देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी तात्काळ मंजूर केले. या मदत योजनेसाठी राज्यातील एकूण 30 हजार 901 देहविक्रय करणा-या महिला आणि 6 हजार 451 लहान मुलांची नोंदणी करण्यात आली. महिला बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था आणि त्यांच्या द्वारे निधी घेऊन प्रकल्प चालविणा-या संस्था यांच्या मार्फत या आदेशाची अमंलबजावणी केली जात आहे. त्यानुसार दरमहा पाच हजार रूपये आणि त्यांना लहान मुले असल्यास अडीच हजार रूपयांची तरतूद केली आहे. मात्र ज्या जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्या समित्यांमध्ये देहविक्रय करणा-या महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे ही मदत सर्व महिलांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. या मदतीची मंजुरी मिळून चार महिने उलटून गेले आहेत. अजूनही ज्या महिलांची नावे पाठविली त्यातील पहिल्या यादीतल्या सर्व महिलांना देखील मदत मिळालेली नाही आणि इतर यादयाही मागविल्या गेल्या नाहीत याकडे संस्थेने लक्ष वेधले आहे.

--------------------------

देशातील इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वप्रथम कोव्हिड संदर्भात आपत्कालीन मदत जाहीर करून अंमलबजावणीला सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्रातील देहविक्रय करणा-या महिला त्यांचे आभार मानतात. पण या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आणि लाल फितीचा कारभार याची चिंता वाटते. हे आर्थिक वर्ष संपायला च्या आत सगळ्या महिलांना मदत पोहोचणार का हा प्रश्न नक्कीच उपस्थित राहतो- तेजस्वी सेवेकरी, सहेली संस्था

-----------------------------------------------

Web Title: Prostitutes still deprived of government assistance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.