बारामती एमआयडीसीतील वेश्याव्यवसाय उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:34+5:302021-06-10T04:08:34+5:30
बारामती एमआयडीसीतील वेश्याव्यवसाय उघड ग्रामीण पोलीसांची कारवाई बारामती :बारामती एमआयडीसीत अपूर्ण बांधकाम असलेल्या इमारतीत सुुरू असलेला वेश्याव्यवसाय ...
बारामती एमआयडीसीतील वेश्याव्यवसाय उघड
ग्रामीण पोलीसांची कारवाई
बारामती :बारामती एमआयडीसीत अपूर्ण बांधकाम असलेल्या इमारतीत सुुरू असलेला वेश्याव्यवसाय ग्रामीण पोलीसांनी उघड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मंगळवारी (दि. ८) ही कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: याप्रकरणी पोलीस कर्मचारी नंदू जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानुसार या प्रकरणी अनिल रामचंद्र देवकाते (वय ४३, रा. नीरावागज, ता. बारामती) याच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक ढवाण यांना देवकाते हा तांबेनगरजवळील एका अपूर्ण बांधकाम असलेल्या इमारतीत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैशाचे आमिष दाखवत महिलेकडून वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पंच तयार करण्यात आले. बनावट ग्राहकाकडे पैसे देत या ठिकाणी पाठविण्यात आले. या सदनिकेत देवकाते याने संबंधित महिला दाखवत बनावट ग्राहकाकडून एक हजार रुपये स्वीकारले. बनावट ग्राहकाने लागलीच मिस्ड कॉल करत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी छापा टाकण्यात आला.यावेळी देवकाते याला ताब्यात घेण्यात आले. मूळची अकोला जिल्ह्यातील व सध्या रांजणगाव एमआयडीसीत राहणारी २२ वर्षीय महिलेला देवकाते याने येथे वेश्याव्यवसायासाठी आणले होते. पैशाचे आमिष दाखवत देवकाते हे काम करून घेत असल्याचे या पीडित महिलेने सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सपोनि योगेश लंगुटे यांच्यासह राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, महिला पोलिस नाईक दळवी यांनी या कारवाईत भाग घेतला.