Pune: आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: December 13, 2023 05:32 PM2023-12-13T17:32:28+5:302023-12-13T17:32:55+5:30
पोलिसांनी उमेश मलाप्पा तराळ (रा. बालाजी हाऊसिंग सोसायटी, बालाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे....
पुणे : आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला असून, सहकारनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात एका हॉटेल जवळ सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रात उपचाराच्या नावाखाली मुलींना पैशांचे आमिष दाखवत वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. पोलिसांनी उमेश मलाप्पा तराळ (रा. बालाजी हाऊसिंग सोसायटी, बालाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस हवलदार अजय नारायण राणे यांनी तराळ विरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजय नारायण राणे हे सामाजिक गुन्हे शाखेत नेमणुकीस आहे. सामाजिक सुरक्षा विभागाला उमेश तराळ हा पीडित मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त करून घेत, त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाली होती.
यानंतर पोलिस पथकाने बनावट ग्राहक पाठवू खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. तराळ हा आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असताना आढळून आल्याने पोलिसांनी याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप देशमाने करत आहेत.