आयुर्वेद उपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय;पुण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 12:51 AM2020-09-20T00:51:23+5:302020-09-20T00:54:20+5:30
सामाजिक सुरक्षा विभागाची दोन ठिकाणी कारवाई
पुणे : आयुर्वेद उपचाराच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून ३ पीडित तरुणींची सुटका केली आहे. दुसऱ्या एका घटनेत २ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
सातारा रोडवरील आयुर्वेदा बॉडी ट्रिटमेंट सेंटरमध्ये तरुणींना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला होता. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहा'ज कॉम्प्लेक्स येथे छापा घालून तेथून ३ तरुणींची सुटका केली़ त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दामाजी ऊर्फ करण मुरडे (वय ३८) याला अटक केली आहे.
बुधवार पेठेत दोन महिला तरुणींना आणून त्यांना डांबून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश कदम व रमेश चौधर यांना मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून त्याची खात्री केली. खात्री पटताच पोलिसांनी छापा घालून तेथून २ तरुणींची सुटका केली.याठिकाणी वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या २ महिलांना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे उपनिरीक्षक श्रीधर खडके, कर्मचारी अण्णा माने, आश्विनी केकाण, मनिषा पुकाळे, संतोष भांडवलकर, हनमंत कांबळे, खाडे, गायकवाड यांनी केली.