पुणे-सोलापूर महामार्गावरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; केडगावमध्ये छापा टाकून पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:35 AM2024-05-17T10:35:03+5:302024-05-17T10:35:28+5:30
वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे...
केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव येथील पुणे-सोलापूर हायवेलगत असणाऱ्या हॉटेलवर यवत पोलीस ठाण्याने कारवाई केली आहे. येथे असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. तर एका तरुणीची यातून सुटका केली आहे.
कारवाईत आरोपी वैभव दिपक पाटील (वय २४ वर्षे, सध्या रा. सागर लॉज केडगांव ता. दौंड जि. पुणे मुळ रा. टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापुर) व अक्षय विलास मांढरे (वय. २३ रा. वरवंड, ता. दौंड) या दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी विविध ७० हजार रुपयांचे वेश्या व्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त केले आहे.
पुणे-सोलापूर जाणारे हायवे रोडलगत असणारे सागर बार अँड लॉजमध्ये सदर कारवाई झाली. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या निरीक्षणाखाली प्रणव जालिंदर ननवरे, पोलीस शिपाई झेंडे, अंमलदार शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली आहे.