लोहगावच्या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:01+5:302021-09-04T04:14:01+5:30
पुणे : लोहगावच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर गुरुवारी (दि. २) छापा टाकून विमानतळ पोलिसांनी तिघांना अटक केली. ...
पुणे : लोहगावच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर गुरुवारी (दि. २) छापा टाकून विमानतळ पोलिसांनी तिघांना अटक केली. उदय श्रीरामजी सिंग (वय ३८), विजयकुमार बिहारीलाल गुप्ता (वय २५) आणि चंद्रशेखर विश्वनाथ हेगडे (वय ५४, तिघेही रा. हॉटेल तोरणा बार अँड रेस्टॉरंट, लोहगाव) हे संशयित आरोपींची नावे आहेत. या संदर्भात वसंत भोजरात शेट्टी आणि प्रदीप नारायण शेट्टी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. लोहगाव येथील पोरवाल रोडवर हॉटेल तोरणा बार अँड रेस्टॉरंट लॉज आहे. आरोपींनी मूळ मालक दगडू खांदवे यांच्याकडून लिव्ह अँड लायसन्स करारनामा करून हे हॉटेल चालविण्यास घेतले होते. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक पाठवून त्याची खात्री केली व त्यानंतर तेथे छापा टाकून तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तपास याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.