Pune News | रावेतमध्ये लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 14:55 IST2023-01-05T14:55:09+5:302023-01-05T14:55:27+5:30
ही कारवाई सोमवारी (दि. २) सायंकाळी रावेत येथे करण्यात आली...

Pune News | रावेतमध्ये लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पिंपरी : लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये एकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. २) सायंकाळी रावेत येथे करण्यात आली.
भीमराव दत्तोबा म्हस्के (वय ६०, रा.काळेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह काळेवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. आरोपी भीमराव आणि त्याची साथीदार महिला हे एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते. छाप्यामध्ये पोलिसांनी आठ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त केला.