बाणेरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून स्पा मॅनेजरला अटक तर तीन तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:27 IST2024-12-04T12:25:23+5:302024-12-04T12:27:14+5:30

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापेमारी केली आणि वेगळेच सत्य समोर आले.

Prostitution in the name of massage center in Baner crime branch arrests spa manager and frees three young women | बाणेरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून स्पा मॅनेजरला अटक तर तीन तरुणींची सुटका

बाणेरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून स्पा मॅनेजरला अटक तर तीन तरुणींची सुटका

किरण शिंदे

पुणे :
पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणाऱ्या एका 'स्पा'वर छापा टाकला. या स्पा' मध्ये मसाज सोडून भलतंच सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापेमारी केली आणि वेगळेच सत्य समोर आले. या ठिकाणी स्पा'च्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील मुरकुटे कॉम्प्लेक्स मध्ये 'मुन थाई स्पा' या नावाने एक मसाज पार्लर आहे. मात्र या मसाज पार्लरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. आणि त्यानंतर या ठिकाणी सुरू असणार सेक्स रॅकेट उध्वस्त केले. पोलिसांनी जेव्हा या ठिकाणी छापीमारी केली तेव्हा तीन तरुणी वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. पोलिसांनी या तीनही तरुणींची सुटका केली. तर स्पा मॅनेजर सत्ताउद्दीन मोहम्मद दिलवार हुसेन (वय २२, रा. जुनी सांगवी) याला अटक केली आहे.

स्पा मॅनेजर सत्ताउद्दीन मोहम्मद दिलवार हुसेन याने पीडित तरुणींना पैशाचे आमिष दाखवले आणि स्पा च्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपी या तरुणांकडून वेश्याव्यवसाय करून घ्यायचा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजीविका करायचा. बाणेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पिटा ३,४,५ व भारतीय न्याय संविधान कलम १४३ ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Prostitution in the name of massage center in Baner crime branch arrests spa manager and frees three young women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.