कोंढव्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय,पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल,परदेशातील तरुणी ताब्यात

By नितीश गोवंडे | Published: December 3, 2024 12:19 PM2024-12-03T12:19:13+5:302024-12-03T12:23:05+5:30

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने ...

Prostitution under the name of massage center in Kondhwa, case registered against massage center operator, four young women from abroad detained  | कोंढव्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय,पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल,परदेशातील तरुणी ताब्यात

कोंढव्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय,पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल,परदेशातील तरुणी ताब्यात

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी परदेशातील तरुणीसह तिघींना ताब्यात घेतले, तसेच मसाज सेंटरच्या व्यवस्थापकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक शिव राजेश भोसले (२१, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा), मालक निखिल राजेंद्र नाईक (२६, रा. फुरसुंगी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक छाया जाधव यांनी याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, एनआयबीएम रस्त्यावरील आयरीन स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. तेव्हा मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

परदेशातील तरुणीसह तिघींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत भोसलेने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली. तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. पाेलिसांच्या पथकाने मसाज सेंटरमधून मोबाइल, तसेच अन्य साहित्य असा ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Prostitution under the name of massage center in Kondhwa, case registered against massage center operator, four young women from abroad detained 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.