सुरक्षारक्षकांची कपात ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 02:52 AM2017-11-11T02:52:27+5:302017-11-11T02:52:33+5:30

प्रशासनाने महापालिका सुरक्षारक्षकांच्या संख्येत केलेली कपात आता ऐरणीवर आली आहे.

Protector's cut-off ankle | सुरक्षारक्षकांची कपात ऐरणीवर

सुरक्षारक्षकांची कपात ऐरणीवर

googlenewsNext

पुणे : प्रशासनाने महापालिका सुरक्षारक्षकांच्या संख्येत केलेली कपात आता ऐरणीवर आली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रशासनाच्या पाठीशी थांबले असले, तरी विरोधातील राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यांनी मात्र यावर रान उठवले आहे. सर्वसाधारण सभेत शुक्रवारी या विषयावरून त्यांनी गोंधळ घातला.
महापालिकेने कंत्राटी स्वरूपात ठेकेदार कंपन्यांकडून तब्बल १ हजार ७०० सुरक्षारक्षक घेतले आहेत. त्यांतील अनेक जण राजकीय वरदहस्त असलेले होते. अनेक जण कामावर उपस्थित नसत. काही ठिकाणी गरज नसताना जास्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले होते. प्रशासनाने त्यावर बोट ठेवून तब्बल ९०० सुरक्षारक्षकांची कपात केली; मात्र त्यामुळे नगरसेवक संतापले. दोन महिन्यांपासून हा विषय महापालिकेत गाजत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे व साईनाथ बाबर हे सभागृहात सुरक्षारक्षकांचा गणवेश घालून आले होते. मोरे यांनी प्रशासनावर टीका केली. काही जण कामचुकार असतील, कामावर जात नसतील हे खरेही असेल; मात्र त्यांनाच कमी करण्याऐवजी सरसकट ९०० जणांना बेरोजगार करीत असल्यावर त्यांनी आक्षेप घेतले. इतकी वर्षे चालत होते; मग आताच त्यांची गरज कमी का झाली, असा प्रश्न त्यांनी विचारला.
माजी उपमहापौर दीपक मानकर, वसंत मोरे, सुनीता वाडेकर आदींनी या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. कायम शिपायांच्या ६०० पेक्षा जास्त जागा रिक्त असताना त्या भरल्या का जात नाहीत, अशी विचारणा मानकर यांनी केली. गफूर पठाण, अविनाश बागवे सुरक्षारक्षकांच्या निविदेबाबत काही बोलण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र त्यांना महापौर मुक्ता टिळक यांनी थांबवले. त्यावरून बराच गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मध्यस्थी करून सदस्यांना बोलू द्यावे, असे सांगितले. प्रकाश कदम यांनी वापरलेल्या एका शब्दावरून पुन्हा वाद झाला. मोरे व धीरज घाटे यांनी तो शब्द कामकाजातून काढण्यास सांगितले.

Web Title: Protector's cut-off ankle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.