ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:39+5:302021-09-02T04:21:39+5:30

बारामती : ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती नगरपरिषदेमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय ...

Protest against attack on women officers of Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध

ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध

googlenewsNext

बारामती : ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती नगरपरिषदेमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन केले.

३० आॅगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या सायंकाळी ५.३० च्या सुमारास अतिक्रमणविरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करीत होत्या. यावेळी तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले अमरजित यादव यांनी पिंगळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. या हल्लयात या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब आहे. या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेच्यावतीने या गुन्हेगारी कृत्त्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितले.

बारामती नगरपरिषदेमधील अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन केले.

३१०८२०२१ बारामती—०८

Web Title: Protest against attack on women officers of Thane Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.