काम बंद ठेवून वकीलावरील हल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 03:21 PM2018-10-23T15:21:41+5:302018-10-23T15:28:04+5:30

वकीलावर गाेळीबार झाल्याच्या घटनेचा निषेध करत पुणे बार असाेसिएशनकडून कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.

protest against attempt to murder of lawyer | काम बंद ठेवून वकीलावरील हल्याचा निषेध

काम बंद ठेवून वकीलावरील हल्याचा निषेध

Next

पुणे : व्यावसायिक कारणावरुन वकीलावर गाेळीबार केल्याच्या निषेधार्थ पुणे बार असाेसिएशनने काम बंद ठेवत निषेध नाेंदवला. शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर सर्व वकीलांनी घाेषणा देत अापला राेष व्यक्त केला. तसेच वकीलांच्या संरक्षणाचा कायदा करण्याची मागणी केली. 

    अ‍ॅड देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री गोळीबार करुन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात अाला. ढोकणे यांनी सोमवारी सायंकाळी न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आपल्या पक्षकारांच्या गाठी भेटी घेतल्या़. त्यानंतर काल रात्री आठच्या सुमारास ते स्वीफ्ट कारने येरवडा येथील घरी निघाले़. भरत ढोकणे हे  कार चालवत होते़.  तर देवानंद ढोकणे हे त्यांच्या शेजारी बसले होते़.  संगमवाडी येथील बीआरटी बसस्टॉपसमोर कार आली असताना तेथील स्पीड ब्रेकरमुळे कार हळू झाली़. ही संधी साधत पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोराने कारमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या देवानंद यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या होत्या़.  या प्रकरणी गुन्हे शाखेने दाेघा अाराेपींना जेरबंद केले अाहे. कुर्मादास बडे (रा़ शिरुर) असे त्याचे नाव असून दुसऱ्या संशयित आरोपी अल्पवयीन आहे. व्यावसायिक कारणातून गाेळीबार केल्याचे तपासातून समाेर येत अाहे. 

    दरम्यान अाज वकीलांनी काम बंद ठेवत या घटनेचा निषेध व्यक्त केला. शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर सर्व वकीलांनी जमून घाेषणा दिल्या. यावेळी बाेलताना पुणे बार असाेसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार म्हणाले, अॅड ढाकणे यांच्यावर गाेळीबार करणाऱ्या अाराेपींचे वकीलपत्र महाराष्ट्रात कुणीही घेऊ नये असा ठराव संमत करण्यात अाला अाहे. अाज पुणे जिल्ह्यातील सर्व बार असाेसिएशनच्या सदस्यांनी कामकाजात सहभाग घ्यायचा नाही असा निर्णय घेण्यात अाला असून त्याबाबत सर्वांना कळविण्यात अाले अाहे. अॅडव्हाेकेट प्राेटेक्शन अॅक्ट हा महत्वाचा असून त्यात कुठल्या तरतुदी असाव्यात याबाबत अाम्ही चर्चा करत अाहाेत. तसेच हा कायदा लवकरात लवकर कसा अंमलात येईल याबाबत अाम्ही पाठपुरावा करणार अाहाेत. 
 

Web Title: protest against attempt to murder of lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.