केंद्रसरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणाचा मुळशीत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:03+5:302020-12-11T04:29:03+5:30
--- घोटवडे : ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले परंतु शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली ...
---
घोटवडे : ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले परंतु शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही त्यामुळे घोटवडे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली व नुकसान भरापाई तातडीने मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले.
सदर विषयाचा निषेध घोटवडे फाटा येथे शांततामय आंदोलन केले व तहसीलदार अभय चव्हाण साहेब याना निवेदन दिले सदर प्रसंगी पौड पोलिस स्टेशनचे जेष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ साहेब व नायबतहसीलदार भगवान पाटील हजर होते.
यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे, सचिव साहेबराव भेगडे, सदस्य रासू शेलार, हनुमंत सुर्वे , राष्ट्रवादी कॉंग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती व शिवसेना सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ, जिल्हा संघटक राम गायकवा, सुनील वाडकर, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, माउली डफळ, संतोष तोंडे, आनंद घोगरे नीलेश गोडाबे ,भिजित वायकर, तात्यासाहेब देवकर उपस्थित होते.