मनसे महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले शंभर जाेडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:43 PM2018-09-05T14:43:11+5:302018-09-05T14:44:28+5:30
अामदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत मनसे महिला सेनेच्या वतीने जाेडे माराे अांदाेलन करण्यात अाले.
पुणे : अामदार राम कदम यांनी दहीहांडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विराेधात शहर मनसे महिला सेनेकडून जाेडे माराे अांदाेलन करण्यात अाले. अलका चाैकात महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारले. मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठाेबरे यांच्या नेतृत्वाखाली हे अांदाेलन करण्यात अाले.
तुम्हाला एखादी मुलगी अावडली तिने तुम्हाला नकार दिला अाणि जर तुमच्या घरच्यांना ती मुलगी पसंद असेल तर तिला उचलून अाणू असे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी मुंबईतील घाटकाेपर येथील दहीहांडी साेहळ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना संबाेधताना केले हाेते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका हाेत अाहे. मनसे महिला सेनेच्या वतीने अलका चाैकात निदर्शने करण्यात अाली. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारण्यात अाले. यावेळी रुपाली पाटील- ठाेंबरे म्हणाल्या, राम कदमांना सत्तेचा माज अालेला अाहे. त्यांना महिलांबद्दल कुठलाही अादर राहिलेला नाही. त्यांचं वक्तव्य हे महिलांचे अपमान करणारे अाहे. त्यामुळे अाम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारले अाहेत. राज राहेबांनी अाम्हाला परवानगी दिली तर अामची एक महिला कार्यकर्ती घाटकाेपरमध्ये जाऊन त्यांना स्त्री शक्ती दाखवून देईल.