इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:45+5:302021-08-22T04:13:45+5:30
या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संध्या जाधव, जिल्हा उपाध्यक्षा कांचन ढमाले, मंगल चांभारे, मनीषा टाकळकर, रोहिणी देशमुख, ...
या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संध्या जाधव, जिल्हा उपाध्यक्षा कांचन ढमाले, मंगल चांभारे, मनीषा टाकळकर, रोहिणी देशमुख, शहराध्यक्षा स्मिता शहा, जिल्हा सरचिटणीस शोभा शेवकरी, ओबीसी सेल तालुका अध्यक्षा मंगल जाधव, सुजाता कड, ज्योती वाघ, प्रतिभा देसले, सरिता वाघमारे, सृष्टी मेदनकर, मेघना देशमुख, आशा तांबे, रूपाली गव्हाणे, कल्याणी गायकवाड, वैशाली कोहिणकर, मीनाक्षी भांगे, पूजा सांडभोर, मनीषा सांडभोर, चाकण शहराध्यक्ष राम गोरे, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मोबिन काझी आदींसह राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
खेड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने केंद्र शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर या इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तुरडाळ, तेलबिया, कडधान्य, भाजीपाला यांच्या वाढत्या किमतीत गेल्या वर्षभरात तिपटीने वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या या वाढत्या किमती रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत आणि जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
----------------------------
210821\screenshot_20210821-165303_youtube.jpg
चाकणला इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करताना