पीडित प्राध्यापकाच्या पत्नीचे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:45+5:302021-08-27T04:15:45+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहमदनगर जिल्ह्यातील बोधोगाव येथील आबासाहेब काकडे कला महाविद्यालयात बाळासाहेब बनसोडे हे पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहमदनगर जिल्ह्यातील बोधोगाव येथील आबासाहेब काकडे कला महाविद्यालयात बाळासाहेब बनसोडे हे पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मात्र, तत्कालीन प्राचार्यांनी त्यांच्या सेवापुस्तिकेत खाडाखोड केली. तसेच त्यांच्याकडे पूर्णवेळ पदभार असताना तासिका तत्त्वावर दाखवले. त्याचप्रमाणे बनसोडे यांना कोणतीही कल्पना न देता उच्च शिक्षण विभागाने त्यांच्या वेतनातून १ लाख ३२ हजार रुपये वसूली केली. तसेच काकडे महाविद्यालयाने सुद्धा त्यांच्याकडून पूर्णवेळ प्राध्यापकाचे काम करून घेऊन शिपाई पदावर असणा-या व्यक्तीचे वेतन देऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिका-यांना अनेक वेळा निवेदन देऊनही त्यांची दखल घेतली गेली नाही. अखेर हृदयविकाराने त्यांने निधन झाले. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले असल्याचे कांचन बनसोडे यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिका-यांनी याबाबत सांगितले, संबंधित प्रकरणाचा अभ्यास करून सुधारित अहवाल उच्च शिक्षण कार्यालयाला सादर केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी पुरेसा वेळ आवश्यक आहे.