Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Published: November 1, 2023 10:35 AM2023-11-01T10:35:06+5:302023-11-01T10:36:06+5:30

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

Protest near Navale bridge for Maratha reservation; A case has been registered against 500 people | Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

पुणे :मराठा आरक्षणासाठी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी  सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी (३१ आॅक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली.

खेड-शिवापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Web Title: Protest near Navale bridge for Maratha reservation; A case has been registered against 500 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.