पुलवामा हल्ल्याचा निषेध : मद्यधुंद तरुणांची पार्टी पाडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:15 AM2019-02-19T02:15:14+5:302019-02-19T02:15:31+5:30

पुलवामा हल्ल्याचा निषेध : दोन दिवस तरुणाई झाली बेधुंद

The protest of the Pulwama attack: The party of drunken youths is closed | पुलवामा हल्ल्याचा निषेध : मद्यधुंद तरुणांची पार्टी पाडली बंद

पुलवामा हल्ल्याचा निषेध : मद्यधुंद तरुणांची पार्टी पाडली बंद

Next

वाघोली : एकीकडे संपूर्ण देश पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या शोकाकुलात बुडालेला असताना दहशतवाच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना, मात्र सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहारातील विमाननगर पोलीस ठाणे क्षेत्रातील खांदवेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये मात्र सुपरसॉनिक फेस्टिव्हलच्या नावाखाली भरविण्यात आलेल्या पार्टीमध्ये दोन दिवस आणि रात्र तरुण-तरुणी मद्यधुंद होऊन डीजेच्या तालावर धिंगाणा सुरू होता.

युवासेना, मनसे, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला. याबाबत पोलिसांना रीतसर निवेदन देऊन कार्यक्रम रद्द करण्याची केली मागणी केली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या आंदोलनामुळे एक तास वाहतूककोंडी झाली होती.

पाश्चिमात्य संस्कृतीचा धिंगाणा आम्ही कधीही खपवून घेणार नाही. देश शोकसंदेशात असताना ही गोष्ट खूप लाजीरवाणी आहे. वेळ प्रसंगी आम्ही कार्यक्रम उधळून लावला असता.
- गणेश म्हस्के, मनसे

हा कार्यक्रम बंद केला नसता तर आम्ही तो उधळून लावला आसता. देश दु:खात असताना इकडे हा धिगांणा सुरू होता.
चंद्रशेखर घाडगे,
संभाजी ब्रिगेंड

४या वेळी सर्जेराव वाघमारे, विशाल सातव, गणेश म्हस्के, चंद्रशेखर घाडगे, ओंकार तुपे, प्रकाश जमधने, प्रशांत धुमाळ, हितेश बोराडे, शिवाजी पवार, यांच्यासह युवासेना, मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

४मात्र पोलीस कार्यक्रम बंद करण्याऐवजी संयोजकांचीच बाजू घेत कार्यक्रत्यावर दम बाजी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमाचा पोलिस बंदोबस्त वाढवला. पोलीसांनी खबरदारी म्हणून पोलिस पिंजरा देखील बोलविला .परंतु अखेरिस पोलिस अधीकारी शिंदे यांनी कार्यकत्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम फक्त अर्ध्या तासासाठी बंद केला.
 

Web Title: The protest of the Pulwama attack: The party of drunken youths is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे