संमेलनाला विरोध; स्वत:ही ‘सहभागी’

By admin | Published: November 30, 2014 12:45 AM2014-11-30T00:45:59+5:302014-11-30T00:45:59+5:30

एकीकडे ‘ते’ साहित्य संमेलनावर टीका करीत विरोध दर्शवितात; पण दुसरीकडे स्वत: संमेलनात सहभागी होतात,

Protests against the assembly; Automatically 'participants' | संमेलनाला विरोध; स्वत:ही ‘सहभागी’

संमेलनाला विरोध; स्वत:ही ‘सहभागी’

Next
पुणो : एकीकडे ‘ते’ साहित्य संमेलनावर टीका करीत विरोध दर्शवितात; पण दुसरीकडे स्वत: संमेलनात सहभागी होतात, अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणो यांनी भालचंद्र नेमाडे यांच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. 
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग आहे. यावर चर्चा करणो हा वेळेचा अपव्यय आहे, अशा प्रकारची विधाने करून  ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे यांनी संमेलनाच्या आयोजनाची खिल्ली उडवली. या संदर्भातील नेमाडे यांच्या दुटप्पी भूमिकेवर फुटाणो यांनी मात्र एक प्रकारे प्रहार केला. नेमाडे हे सत्यशोधक आहेत. त्यामुळे त्यांनी बोलत राहिले पाहिजे, संमेलनाला त्यांचा विरोध असला, तरी ते संमेलनाला जातात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या समवेत  घुमानच्या संमेलनाचे आयोजक सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि स्वागताध्यक्ष भारत देसडला उपस्थित होते. 
नेमाडे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष का केले जात नाही? याविषयी विचारले असता फुटाणो म्हणाले, नेमाडे यांना अध्यक्ष करणारे आम्ही कोण? खरे तर ज्या साहित्यिकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना संमेलनाध्यक्ष करायला पाहिजे. मात्र, साहित्य महामंडळाच्या घटनेत अशा प्रकारची कोणतीच तरतूद नाही. यासाठी घटनादुरुस्ती झाली पाहिजे. मात्र, अजूनही महामंडळाच्या घटनादुरुस्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. 
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी कृषिमंत्री शरद पवार, तसेच पंजाबचे महापौर प्रकाशसिंग बादल आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुरुदयाल सिंग उपस्थित राहणार आहेत. नहार म्हणाले, संमेलनात दर वर्षी टीका  होतच असते. मात्र, या टीकेलाही आम्ही सकारात्मक पद्धतीनेच घेणार आहोत. 
(प्रतिनिधी)
 
साहित्यिकांना 25 ते 3क् हजार रुपये इतके प्रकाशकांकडून मानधन मिळते. तेवढय़ा पैशांत साहित्यिक कुठे कुठे जाणार? त्यामुळे संमेलनासाठी निधी हा उभारावाच लागतो. हा निधी उभारणो ही आयोजकांसाठी मोठी तारेवरची कसरत असते.
- रामदास फुटाणो
 
4आमचा संबंध हा केवळ संमेलनापुरता आहे. नेमाडे यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आम्हाला कोणतेही भाष्य करायचे नाही, असे सांगून संमेलनाविषयी सध्या काही मंडळींकडून चुकीचे वातावरण निर्माण केले जात आहे, याबद्दल मात्र नहार आणि देसडला यांनी नाराजी व्यक्त केली. देसडला म्हणाले, संमेलनासाठी येणा:या 3 हजार प्रतिनिधींच्या माध्यमातून सुमारे 75 लाख रुपये, राज्य शासनाकडून 25 लाख रुपये आणि मित्रमंडळी, संस्था आणि संघटनांकडून उर्वरित रक्कम संकलित केली जाणार आहे. रेल्वे, संमेलन मंडप, निवास व्यवस्था या सगळ्या व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. संमेलनाला यापूर्वीच्या सर्व स्वागताध्यक्षांना नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Web Title: Protests against the assembly; Automatically 'participants'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.