Baramati: जैन मुनींच्या हत्येप्रकरणी बारामतीत निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:06 PM2023-07-13T16:06:43+5:302023-07-13T16:07:00+5:30

उपविभागीय अधिकाऱ्यांना सकल जैन समाजाच्या वतीने निवेदन...

Protests in Baramati to protest the killing of Jain sages; Report given to Sub-Divisional Officers | Baramati: जैन मुनींच्या हत्येप्रकरणी बारामतीत निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

Baramati: जैन मुनींच्या हत्येप्रकरणी बारामतीत निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

googlenewsNext

बारामती (पुणे) : कर्नाटकातील चिकोडी येथे श्री १०८ कामनंदी महाराज यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. त्यांच्या हत्येचा बारामतीतील सकल जैन समाजाच्या वतीने आज निषेध नोंदविण्यात आला. अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरातील जैन समुदायात संतापाची लाट उसळली.

बारामतीतही सकल जैन समाजाच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना भेटून याबाबत निवेदन दिले गेले. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत यातील दोषींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सकल जैन समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवा, अशी विनंती उपविभागीय अधिकाऱ्यांना समाजबांधवांनी केली.

भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच या घटनेतील प्रत्येक दोषी व्यक्तीस शोधून त्याला कठोर शासन व्हायला हवे, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी संजय संघवी, दिलीप धोका, मेहुल दोशी, धवल वाघोलीकर, राजू मेथा, महावीर वडूजकर, विशाल वडूजकर, अतुल गांधी, ललित टाटीया, दिलीप दोशी, किशोर कोठारी, जवाहर कटारिया, केवल मोता, जिगर ओसवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Protests in Baramati to protest the killing of Jain sages; Report given to Sub-Divisional Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.