आरोग्य सेवक असल्याचा अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:58+5:302021-01-17T04:10:58+5:30
ठिकाण - रूबी हॅाल क्लिनिक वेळ - ११.०० लसीकरणाला सुरुवात ; रुबी हॉल क्लीनिक मधील शंभर कर्मचाऱ्यांना टोचवली लस ...
ठिकाण - रूबी हॅाल क्लिनिक
वेळ - ११.००
लसीकरणाला सुरुवात ; रुबी हॉल क्लीनिक मधील शंभर कर्मचाऱ्यांना टोचवली लस
पुणे : कोरोना महामारी विरोधात सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी यशस्वी लढा दिला. परिस्थिती भायनक होती. विश्वासाने आणि धाडसाने कोरोना विरोधात लढलो. याचा अभिमान असून लसीकरणाच्या पहिल्या मोहिमेत रुबी हॉल क्लीनिक रुग्णालयाच्या वतीने पाहिली लस घेण्याची संधी मिळाली, याचा अभिमान वाटतो. लस घेण्याची उत्सुकता होती. लस घेतल्यानंतर कोणताही परिणाम जाणवला नाही. नेहमीप्रमाणे इंजेक्शन घेतो तसे वाटले. खुप आनंद वाटत आहे. देशातून तीही पुण्यातून लस निर्माण झाली, याचे कौतुक वाट असून देशाचा आणि पुण्याचा अभिमान वाटतो. रुबी हॉल क्लीनिक रुग्णालयातील डॉ. अविनाश नानीेवाडेकर यांनी ही भावना व्यक्त केली.
रुबी क्लीनिक हॉल रूग्णालयात लसीकरणाला शनिवारी (दि. १६) सुरुवात झाली. यावेळी रुबी हॉल क्लीनिकचे संचालक परवेज ग्रँट, डॉ. रिबेका जॉन, डॉ. रुपाली सूर्यवंशी, डॉ. अवधूत बोदमवाड, डॉ. कपिल झिरपे, डॉ. नीता मुन्शी, अवरो चटर्जी आणि कर्मचारी तसेच महापालिकेच्या विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ .रेखा गलांडे , डॉ संदीप धेंडे, डॉ सिद्धार्थ वाघमारे, डॉ विक्रांत लोंढे,
आरोग्य कर्मचारी विक्रम चोपडे, शैलेश चव्हाण, नितीन पगारे, अतुल देसाई, आदी उपस्थित होते.
लसीकरणाची सुरुवात सकाळी ११ वाजता झाली. महानगरपालिकेने निवडलेल्या यादीनुसार प्रथम शंभर कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. लसीकरण मोहीम सुरु होण्याआधीच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. गेट च्या सुरुवातीलाच लसीकरण माहितीचे पोस्टर लावण्यात आले होते. स्वागत कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष उभारण्यात आले होते. लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना पहिल्या लसीकरणाची सुरुवात कधी होते, याची उत्सुकता लागली होती. नर्स, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. वरीष्ठ डॉक्टरांकडून वारंवार नर्स स्टाफला सूचना देण्यात येत होत्या. एकूणच आनंदाचे व उत्साहाचे वातावरणात दिसून येत होते. दीपप्रज्वलनाने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. 30 मिनिटांच्या निरीक्षणानंतर संबंधित व्यक्तीला सोडण्यात येत होते.
चौकट
सुरुवातीला रुग्णालयाच्या वतीने पहिल्या शंभर कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी यादी तयार करण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेने निवडलेल्या नावांच्या यादीनुसार आणि नियमानुसारच लसीकरण प्रकिया राबविली जात आहे. लस घेण्याची उत्सुकता आहे. या टप्प्यानंतर आता पुढील यादी देखील महानगरपालिकाच तयार करणार आहे. रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते सफाई कर्मचाऱ्या पर्यंत सुमारे साडेतीन हजारहुन अधिक कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी तयार केली आहे. यानंतर अत्यावश्यक सेवा विभाग तसेच ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. टप्प्याने महानगरपालिकेच्या नियमानुसार लसीकरण केले जाणार आहे.
- डॉ. मनीषा करमरकर, केंद्र प्रमुख.