पुण्यातील‘या'प्रसुतीगृहाची अभिमानास्पद कामगिरी! कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:08 PM2020-09-29T12:08:01+5:302020-09-29T13:34:53+5:30

कोरोनाबाधित गर्भवतींच्या प्रसुतीसाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सरसावली

Proud performance of 'Sonawane Maternity Hospital' in Pune! 109 Infants corona free of corona affected mother | पुण्यातील‘या'प्रसुतीगृहाची अभिमानास्पद कामगिरी! कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त

पुण्यातील‘या'प्रसुतीगृहाची अभिमानास्पद कामगिरी! कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देप्रसुतीनंतर १०९ बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊन घरी परतले 

नीलेश राऊत- 
पुणे : कोरोनाबाधित गर्भवती महिलेकडून जन्माला येणाऱ्या नवजात बालकाला कोरोनाची बाधा होऊ नये व बाळ-बाळंतीन दोघेही घरी परतताना कोरोनामुक्त होऊनच परतावे. या ध्येयाने कार्यरत असलेल्या पुणे महापालिकेच्या ‘सोनावणे प्रसुतीगृह’ येथून मे महिन्यापासून तब्बल १०९ कोरोनाबाधित महिलांच्या प्रसुती झाल्या असून, विशेष म्हणजे सर्व बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले आहेत. 
    कोरोना आपत्तीत रूग्णालयाची पायरी चढताना, अन्य कारणास्तव दाखल होणाऱ्या प्रत्येकाचीच कोविड-१९ ची तपासणी संबंधित रूग्णालयाकडून करण्यात येत आहे. अशावेळी केवळ कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या प्रसुतीसाठी महापालिकेचे राज्य शासनाच्या सूचनेनुसार, २ मे पासून भवानी पेठेतील सोनावणे प्रसुतीगृह कोरोनाबाधित गर्भवतींच्या सेवेत रूजू झाले आहे.
    कोरोनाबाधित गर्भवती महिला कोरोनामुक्त करणे तसेच तिच्या पासून नवजात बालकाला कुठल्याही प्रकारे संसर्ग होऊ नये याची विशेष खबरदारी या प्रसुतीगृहात घेण्यात येत आहे. कोरोनाबाधित गर्भवतीच्या प्रसुतीनंतर पुढील पाच दिवस ते नवजात बालक आईकडे न देता, ते अन्य नातेवाईकांकडे सुपूर्त केले जाते़ यामुळे स्तनपान करताना शिशूला कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी येथे घेतली जाते. 

पाच दिवसानंतर त्या शिशूची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आल्यावर, आत्तापर्यंत १०४ शिशूंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, संबंधित शिशूंना जन्मताच सर्व उपचार देताना, त्यांचे पोषणही व्यवस्थित होईल याकरिता संबंधित शिशूच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन व सूचना देण्याबरोबरच सातत्याने त्या नवजात बालकाची आरोग्य तपासणी करण्यातही हे प्रसुतीगृह मागे राहिले नाही. परिणामी आजपर्यंत येथे झालेल्या १०८ प्रसुतीपैकी ८५ सिझर व २१ नॉरर्मल प्रसुती झाल्या असल्यातरी, बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊनच घरी परतले आहेत. 
--------------- 
प्रसुतीगृहात १०८ प्रसुती झाल्या असून, केवळ दोन शिशूंनाच कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. परंतु, ही बाधाही शिशूच्या आईकडून नव्हे तर त्याचा सांभाळ करणाऱ्या अन्य नातेवाईकांच्या मार्फतच झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित नातेवाईक हे कोरोनामुक्त होते, मात्र ते कोविड-१९ विषाणूचे वाहक बनल्याने त्यांचापासूनच ही बाधा शिशूंना झाली. तर इतर प्रसुतीगृहातून दोन बालके येथे कोविड-१९ च्या उपचारासाठी दाखल झाली होती. अशी चारही नवजात बालके अकरा दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आली आहे. मे महिन्यापासून आत्तापर्यंत १०९ प्रसुती सोनावणे प्रसुतीगृहात झाल्या असून, सर्व बाळ बाळंतीन सुखरूप व कोरोनामुक्त असल्याची माहिती प्रसुतीगृहाच्या प्रमुख डॉ. माधुरी रोकडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 
----------------------------

Web Title: Proud performance of 'Sonawane Maternity Hospital' in Pune! 109 Infants corona free of corona affected mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.