अभिमानास्पद ! पुणे विद्यापीठाच्या डाॅ. प्रियांका जावळे यांची अणुउर्जा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:50 PM2019-07-09T17:50:14+5:302019-07-09T17:54:26+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. प्रियांका जावळे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेच्या (IAEA) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झालेल्या परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. प्रियांका जावळे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेच्या (IAEA) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झालेल्या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या परिषदेत सहभागी होण्याऱ्या त्या देशातील एकमेव संशोधक विद्यार्थी ठरल्या. त्यात त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीमुळे त्यांचा पुढच्या वर्षीच्या परिषदेतही सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
IAEA ही संस्था जागतिक स्थरावरील अणुऊर्जा उपाययोजना व त्याच्या शांततापूर्ण वापरावर काम करते. अणुऊर्जेबाबत उपक्रमांवर ही आंतरराष्ट्रीय संस्था जगभरातील नियोजनाचे व नियंत्रणाचे काम करते. भारतही य संस्थेचा सदस्य आहे. परिषदेचा या वेळचा विषय "विभक्त पावर रिऍक्टर कडून विस्थारीत इंधन व्यवस्थापन - भूतकाळापासून शिकणे व भविष्य सक्षम करणे" हा होता. त्यात भारतातून डॉ. प्रियंका जावळे यांची निवड करण्यात आली होती. यावर्षीच्या परिषदेचा विषय हा आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. प्रियंका जावळे या एकमेव भारतीय संशोधनार्थी ची IAEA तर्फे निवड करण्यात आली. ह्या परिषदेमध्ये त्यांचा शोधनिबंध, "परमाणू ऊर्जा - विस्थारीत इंधन व्यवस्थापन व त्या पुढील सामाजिक व कायदेशीर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आव्हाने" या विषयावर मत मांडले. ही परिषद २४ ते २८ जुन २०१९ रोजी, IAEA चे व्हिएन्ना शहरातील मुख्य कार्यालयात पार पडली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये परमाणू/ आण्विक ऊर्जा संदर्भातील संपूर्ण जगभरातून सर्व क्षेत्रातील शोधकर्त्यांमध्ये डॉ. प्रियंका जावळे यांना तरुण पिढीतील विजते पदाचे मानांकन देऊन गौरवण्यात आले. या पुरस्करामध्ये त्यांना पुढील वर्षी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे होणाऱ्या IYNC २०२० च्या परिषदेसाठी नामांकन देऊन आमंत्रित करण्यात आले आहे. या संदर्भात IAEA यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरती दखल घेत. @INDIA in AUSTRIA#IYNC2020 ची माहिती दिली. या परिषदे व्यतिरिक्त डॉ. प्रियंका जावळे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतराळ संशोधणासाठी कामकरणाऱ्या युनाइटेड नेशन्स ऑफिस ऑफ आऊटर स्पेस अफेअर्स (UNOOSA) च्या ६२ व्या वार्षिक सत्रा ला देखील हजेरी लावली.
डॉ. जावळे यांची आण्विक जबाबदारी (न्यूक्लेअर लाएबिलिटी ) ह्या विषयात पीएच. डी. आहे. सध्या त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विभागात पोस्ट डॉक्टरल फेल्लो म्हणून काम करत आहेत व अंतरिक्ष शोधकार्य संदर्भातील जागतिक व राष्ट्रीय जबाबदारी (liability) व अणुऊर्जेचा आंतरळातील वापर या संदर्भातील कायदा व धोरण या विषयावर अभ्यास करत आहेत. ह्या संशोधनासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दुर्गाम्बिनी पटेल मार्गदर्शन करत आहेत.