नका करु दुजेपणा तृतीयपंथी, समलैंगिकांना अापले म्हणा ; पुण्यात एलजीबीटी अभिमान पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 03:45 PM2018-06-03T15:45:48+5:302018-06-03T15:45:48+5:30

गे, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर अभिमान पदयात्रेचे पुण्यात अायाेजन करण्यात अाले हाेते. या पदयात्रेचे यंदाचे अाठवे वर्ष हाेते.

proud rally of LGBT in pune | नका करु दुजेपणा तृतीयपंथी, समलैंगिकांना अापले म्हणा ; पुण्यात एलजीबीटी अभिमान पदयात्रा

नका करु दुजेपणा तृतीयपंथी, समलैंगिकांना अापले म्हणा ; पुण्यात एलजीबीटी अभिमान पदयात्रा

Next
ठळक मुद्देशेकडाे लाेक झाले पदयात्रेत सहभागी377 कलम रद्द करण्याची मागणी

पुणे : नका करु दुजेपणा, तृतीयपंथी, समलैंगिकांना अापले म्हणा, 377 कलम रद्द करा, अशा घाेषणा देत अापल्या हक्कांसाठी समलैंगिक, तृतीयपंथी रस्त्यावर उतरले हाेते. समपथिक ट्रस्टच्या वतीने अाज गे, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर (एलजीबीटी) अभिमान पदयात्रेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. पुण्यातील संभाजी बागेपासून ही पदयात्रा सुरु झाली व डेक्कवरुन फर्ग्युसन रस्त्यावरुन पुन्हा संभाजी बागेसमाेरच तिचा समाराेप करण्यात अाला. या पदयात्रेते शेकडाे लाेक सहभागी झाले हाेते. गेल्या सात वर्षांपासून ही पदयात्रा पुण्यात काढण्यात येत असून यंदाचे या रॅलीचे अाठवे वर्ष हाेते.

 
    पुण्याबराेबरच महाराष्ट्रातील विविध भागांमधील तृतीयपंथी, समलैंंगिक या रॅलीत सहभागी झाले हाेते. त्याचबराेबर नारी समता मंच, हमसफर ट्रस्ट, अभिमान ग्रुप, कशिश ग्रुप, मासूम, सम्यक, तथापि यांसारख्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी या पदयात्रेला पाठींबा दिला हाेता. अापला समाज पुराेगामी अाहे असे अापण म्हणत असलाे तरी अजूनही तृतीयपंथी, समलैगिंक यांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. नाेकरीच्या ठिकाणी असाे, कुटुंब असाे की राहण्याची जागा, अनेकदा एलजीबीटींना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. लाेकांची एलजीबीटींकडे पाहण्याची मानसिकता अजूनही बदलताना दिसत नाही. त्यामुळे लाेकांची मानसिकता बदलावी. कुठेही दुजाभावाची वागणूक मिळू नये, तसेच 377 कलमामध्ये बदल करावा या प्रमुख मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात अाली हाेती. नका करु दुजेपणा, तृतीयपंथी, समलैंगिकांना अापले म्हणा, अाता नाही तर मग कधी 377 बदला अाधी, हाेमाेफाेबिया हॅज टू गाे अश्या घाेषणा या पदयात्रेवेळी देण्यात अाल्या. विविध मागण्यांचे फलकही यावेळी हातात धरण्यात अाले हाेते. 


    या पदयात्रेविषयी बाेलताना समपथिक ट्रस्टचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे म्हणाले, एलजीबीटींच्या हक्कांसाठी ही पदयात्रा काढण्यात अाली हाेती. यंदाचे या पदयात्रेचे अाठवे वर्ष हाेते. या पदयात्रेत जास्तीत जास्त मुख्य प्रवाहातील नागरिक सहभागी हाेत असून ते अाम्हाला साथ देत अाहेत. त्याचबराेबर पाेलीस प्रशासनही नेहमीच अाम्हाला सहकार्य करीत अाले अाहे. त्यांच्या परवानगीमुळे अाम्हाला पदयात्री काढणे शक्य झाले. 377 हे कलम मानवधिकारांचं उल्लंघन करत अाहे. त्यामुळे ते काढून टाकले पाहिजे अशी मागणी अाम्ही या पदयात्रेद्वारा केली. 

Web Title: proud rally of LGBT in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.