वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा, ५० लाखांचे विमा संरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:05+5:302021-05-29T04:09:05+5:30

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी बजावलेल्या ...

Provide frontline worker status, insurance cover of Rs 50 lakh to power workers | वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा, ५० लाखांचे विमा संरक्षण द्या

वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा, ५० लाखांचे विमा संरक्षण द्या

Next

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी बजावलेल्या कामगिरीकडे लक्ष वेधले आहे.

गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोविडच्या पहिली लाट सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. ट्रान्सफॉर्मर बंद पडले. अशा वेळी वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांनी युद्धपातळीवर काम करुन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची कामगिरी केली. मात्र विभागांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी हे फ्रन्टलाईन वर्कर्सच्या दर्जापासून वंचित राहिले.

आता कोविडच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अभियान राबविण्यात आले. या काळातही तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. मात्र स्वतःला कोविडची लागण होण्याचा व जीव गमावण्याचा धोका असतानाही केवळ कर्तव्य म्हणून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. मात्र इतकी चांगली कामगिरी बजावल्यानंतरही अत्यावश्यक सेवेपैकी एक असणाऱ्या वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देण्यात आलेला नाही. या कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

Web Title: Provide frontline worker status, insurance cover of Rs 50 lakh to power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.