ईएसआयसीच्या कोविड रूग्णालयासाठी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:23 PM2021-04-17T17:23:10+5:302021-04-17T17:24:00+5:30

आमदार माधुरी मिसाळ यांची प्रशासनाकडे मागणी

Provide immediate oxygen supply to ESIC's Kovid Hospital | ईएसआयसीच्या कोविड रूग्णालयासाठी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करा

ईएसआयसीच्या कोविड रूग्णालयासाठी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करा

Next
ठळक मुद्देव्हेंटिलेटर खरेदीसाठी २० लाखांचा आमदार निधी

पुणे: बिबवेवाडीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रूग्णालयाचा कोविड रुग्णांवर उपचारांसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करता यावा यासाठी या रूग्णालयाला तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

मिसाळ म्हणाल्या, ‘कोविडच्या दुसर्‍या लाटेत रूग्णांना सर्व प्रकारचे बेड्‌स मिळताना अडचणी येत आहेत. ईएसआयसी रूग्णालयातील बेडची क्षमता १०० इतकी आहे. त्यापैकी ९० बेड्‌सवर ऑक्सिजन आणि १० बेड्‌सवर व्हेंटिलेटरद्वारे रूग्णांवर उपचार होऊ शकतात. मात्र ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी तेथे केवळ ३० रूग्णांवरच उपचार केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठा केल्यास आणखी ७० रूग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून हे केंद्र चालविण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, नोडल ऑफिसर आणि २० एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाल्यास रूग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकेल.  

व्हेंटिलेटर खरेदीसाठी २० लाखांचा आमदार निधी

पुणे शहरात गेल्या आठवडाभरापासून एकही व्हेंटिलेटरयुक्त बेड शिल्लक नसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या रूग्णालयांना व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी आमदार विकास निधीतून वीस लाख रूपये उपलब्ध करून दिले असून, प्रशासनाने खरेदीची प्रकि‘या तातडीने सुरू केली असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.

Web Title: Provide immediate oxygen supply to ESIC's Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.