२२ गावांना खडकवासल्यातून पाणी देण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:07+5:302021-03-21T04:10:07+5:30

निमसाखर : इंदापूर तालुक्यातील २२ गावांना सणसर कटमधून कसे पाणी देता येईल याचा प्रयत्न सुरु आहे. २२ गावांना पाणी ...

To provide water to 22 villages from Khadakwasla | २२ गावांना खडकवासल्यातून पाणी देण्याची

२२ गावांना खडकवासल्यातून पाणी देण्याची

Next

निमसाखर : इंदापूर तालुक्यातील २२ गावांना सणसर कटमधून कसे पाणी देता येईल याचा प्रयत्न सुरु आहे. २२ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी वळण योजनेतून उजनी धरणात पाणी येते त्यातील साडेचार टिएमसी पाणी उचलून ते शेटफळ गडेच्या कॅनमध्ये टाकून ते पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावे आणी खडकवासलाला देण्याची योजना प्रस्तावित आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

निमसाखर (ता.इंदापूर) येथे पी. एन. ३० मोरगाव बारामती नरसिंहपूर रस्ता सुधारणा करणे या कामाचा भुमीपुजन सभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. ते पुढे म्हणाले, मोरगाव बारामती नरसिंहपूर या रस्त्याच्या भुमीपुजन सभारंभ प्रसंगी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, मी राजकारणातून घरी राहिल पण कधी कुणाची फसवणूक करणार नाही. असे सांगत शेवटी भरणे यांनी निमसाखर साठी काय पण, काल पण, आज पण आणी उद्या पण अशी उपरोक्ती लावली त्यामुळे उपस्थितीमध्ये चांगलाच हशा पिकला. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करीत असताना छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी विकास कामांबाबत पाठपुरावा करून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भरणे यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,अतुल झगडे,निमसाखर ग्रामपंचायतीचे सरपंच धैर्यशील रणवरे,नंदकुमार रणवरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विरसिंह रणसिंग, विनोद रणसिंग, अमृतराव रणवरे, मानसिंगराव रणवरे आदी उपस्थित होते

---------------------

फोटो ओळी : निमसाखर येथे मोरगाव बारामती नरसिंहपूर रस्ता सुधारणा करणे या कामाचा भुमीपुजन सभारंभ प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व उपस्थित.

२००३२०२१-बारामती-१४

-------------------------

Web Title: To provide water to 22 villages from Khadakwasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.