वैद्यकीय बिलांच्या पूर्ततेसाठी सव्वादोन कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:47+5:302021-02-27T04:14:47+5:30
पुणे : अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेंतर्गत पुणे महापालिकेच्या सेवकांसह सेवानिवृत्त सेवकांच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीसाठी, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ...
पुणे : अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेंतर्गत पुणे महापालिकेच्या सेवकांसह सेवानिवृत्त सेवकांच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीसाठी, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सव्वादोन कोटी रुपयांची तरतूद वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्यात आली आहे़
सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षासाठीच्या सेवकांच्या आरोग्य साहाय्य योजनेसाठीच्या ४० कोटी ५० लाख रुपयांपैकी ही रक्कम वर्गीकरणातून ३१ मार्च २०२१ पर्यंतकरिता उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़
----
पीएमटी व शिक्षण मंडळाच्या माजी सभासदांनाही अंशदायी योजना
पुणे महापालिकेच्या माजी सभासदांना ज्याप्रमाणे अंशदायी वैद्यकीय सेवा १०० टक्के दिली जाते, त्याचप्रमाणे आता पूर्वीच्या पीएमटी व शिक्षण मंडळाच्या माजी सभासदांना देखील सदर अंशदायी वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे़ आरोग्य विभागामार्फत त्यांची वार्षिक वर्गणी कपात करून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे़
-------------------------------------