MPSC Exam: पीएसआय २०२० परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर; सुनिल खचकड राज्यात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:16 PM2023-07-04T21:16:52+5:302023-07-04T21:17:11+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पाेलीस उपनिरीक्षक - २०२० परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर

PSI 2020 Exam Provisional Selection List Announced Sunil Khachkad first in the state | MPSC Exam: पीएसआय २०२० परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर; सुनिल खचकड राज्यात पहिला

MPSC Exam: पीएसआय २०२० परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर; सुनिल खचकड राज्यात पहिला

googlenewsNext

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पाेलीस उपनिरीक्षक - २०२० परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यात सुनील भगवान खचकड याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर निर्मलकुमार सुर्यकांत भाेसले याने द्वितीय आणि गणेश दत्तात्रय जाधव याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा पीएसआय- २०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या ५८३ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी मंगळवारी दि. ४ जुलै राेजी जाहीर करण्यात आली. तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली असून त्यामध्ये १ हजार ७८२ जणांचा समावेश आहे. ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ६५ पदांचा निकाल राखीव ठेऊन तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प मागविण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये ' पाेस्ट प्रेफरन्स / ऑप्टींग आउट वेबलिंक उपलब्ध करुन दिली असून ती दि. ५ ते १९ जुलै कालावधीत सुरू राहील. उमेदवारांकडून सदर विकल्प प्राप्त झाल्यानंतर तपासणी करून अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने जाहीर केले आहे. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7306 तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी https://mpsc.gov.in/downloadFile/english/7305 या संकेतस्थळावर पाहता येईल.

Web Title: PSI 2020 Exam Provisional Selection List Announced Sunil Khachkad first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.