वैद्यक क्षेत्रातील योद्ध्यांसाठी मनआरोग्य उपचार सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:47+5:302021-04-27T04:11:47+5:30
पुणे : कोरोनाच्या समस्येशी समाजातील सर्व स्तरांवरील सर्वच गट आपापल्या परीने झुंज देण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये, ...
पुणे : कोरोनाच्या समस्येशी समाजातील सर्व स्तरांवरील सर्वच गट आपापल्या परीने झुंज देण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अतोनात वाढला आहे. अतिताणामुळे येणारा भावनिक थकवा, घर आणि काम यामुळे होणारी ओढाताण, कामावर असताना झेलावी लागणारी रोजची आव्हाने यामुळे अनेकांना भावनिक त्रस्ततेचा अनुभव येत आहे. अशा वैद्यकयोद्ध्यांना मदत म्हणून, इन्स्टिट्यूट ्फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आय. पी. एच.) एक अनोखी नि:शुल्क आॅनलाईन सेवा सुरु करणार आहे. या उपक्रमात आय. पी. एच. ठाणे, पुणे आणि नाशिक केंद्रामधले, मनोविकारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ ह्या उपक्रमात सहभागी होत आहेत.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये गेली तीन दशके सतत कार्यरत असलेल्या आय. पी. एच. संस्थेचे कार्यकर्ते संपूर्ण कोरोनाकाळामध्ये प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये रुग्णसेवा देत राहिले आहेत. मनआरोग्य हा वसा अजून एका उपक्रमाद्वारे पुढे नेऊन सुदृढ मन सर्वांसाठी हे ध्येयवाक्य प्रत्यक्षात आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असे संस्थेचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. ही योजना फक्त वैद्यकीय-निमवैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठीच आहे. सोमवार ते शनिवार, सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात, 9324753657 या खास मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, संबंधित डॉक्टर किंवा पॅरामेडिकल व्यावसायिकाला आपले नाव रजिस्टर करता येईल. त्या व्यक्तीची आवश्यक माहिती गुगल-फॉर्मद्वारे घेण्यात येईल.
-----------------------------------------