पुण्याचा अभिनंदन भोसले प्रथम
By admin | Published: November 25, 2014 11:29 PM2014-11-25T23:29:59+5:302014-11-25T23:29:59+5:30
पुणो जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत पुण्याचा अभिनंदन भोसले प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
Next
नीरा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्नी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 3क्व्या पुण्यतिथीनिमित्त पुणो जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत पुण्याचा अभिनंदन भोसले प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. गणोश पवार हा घाटाचा राजा ठरला. पुण्यातील कोंढवा बुद्रुक ते बोपदेव घाटमार्गे पुरंदर तालुक्यातील नीरा शहरापर्यंत 65 कि. मी. अंतराच्या स्पर्धेत दोनशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
कोंढवामधील खडीमशिन परिसरातून सकाळी 1क् वाजता पुण्याचे महापौर दत्तात्नय धनकवडे यांच्या हस्ते स्पर्धेला ङोंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. अत्यंत उत्साही वातावरणात स्पर्धकांनी दिव्य बोपदेव घाट चढून सासवड, जेजुरी, वाल्हेमार्गे नीरा शहर असे सुमारे 65 कि. मी. अंतर अवघ्या पावणोदोन तासांत विजेत्या स्पधर्कांनी पार केले.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्यांची नावे अनुक्रमे -अभिनंदन भोसले (पुणो), शाहीद जमादार (सांगली), हुसेन कोरबू (सांगली), पांडुरंग भोसले (पुणो), विनीत सावंत (मुंबई), दिलीप माने (सांगली), सोहेल बारगे (सांगली), प्रकाश वाल्हेकर (सांगली) अशी असून, तर घाटाचा राजा म्हणून पुण्याचा गणोश पवार याचा सन्मान करण्यात आला. या विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिकांसह गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले. पुणो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पुणो जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, महानंदच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर, विजय कोलते, सुदामराव इंगळे, सारिका इंगळे, विराज काकडे, अंजना भोर, राजेंद्र कोरेकर, विजय थोपटे, शिवाजी पोमण, राजेश काकडे आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते. संग्राम सस्ते यांनी सूत्नसंचालन केले. (वार्ताहर)