पु. ल. देशपांडे यांच्या घरी नसती उठाठेव करणारा चोरटा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 11:02 AM2018-06-25T11:02:51+5:302018-06-25T11:03:04+5:30

ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भांडारकर रोडवरील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या शिरलेल्या व पुस्तकांची नसती उठाठेव करणा-या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

Pu L deshpande home thieves who stole at books were arrested | पु. ल. देशपांडे यांच्या घरी नसती उठाठेव करणारा चोरटा जेरबंद

पु. ल. देशपांडे यांच्या घरी नसती उठाठेव करणारा चोरटा जेरबंद

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भांडारकर रोडवरील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या शिरलेल्या व पुस्तकांची नसती उठाठेव करणा-या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या फ्लॅटमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
 
जितसिंग राजपाल सिंग टाक (वय २४, रा. बिराजदार नगर, वैदुवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या घरी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जितसिंग टाक हा निगडी येथे एका ठिकाणी क्रिकेट खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील व त्यांच्या सहका-यांना मिळाली, त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. हडपसर येथे काही दिवसांपूर्वी दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही जणांना पकडले होते. त्यावेळी जितसिंग हा पळून गेला होता.

जितसिंग याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने भांडारकर रोडवर घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील २, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एक घरफोडी आणि भोसरीतील एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. त्याच्याकडून ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जितसिंग याचा साथीदार सध्या येरवडा तुरुंगात असून त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. 
भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात १८ डिसेंबर २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. बंद असलेली पु. ल. देशपांडे यांची दोन्ही घरे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता.

 पु. ल. देशपांडे यांच्या घरात केवळ पुस्तके व अन्य साहित्य असल्याने त्यांनी संपूर्ण घरात नसती उठाठेव केली, परंतु त्यांना त्यांच्या दृष्टीने मौल्यवान असे काहीही मिळाले नाही. त्यांनी कपाटातील हे साहित्य अस्ताव्यस्त करून टाकून दिले व तेथून निघून गेले होते. ही बाब दुस-या दिवशी उघड झाली. पु. ल. देशपांडे यांचे नातेवाईक दिनेश ठाकूर यांनी अमेरिकेतून आल्यावर याविषयी फिर्याद दिली होती. पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा हा दुस-यांदा हा प्रयत्न झाला होता. इमारतीच्या मागच्या बाजूने शिरलेले हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असले तरी त्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत नव्हते.
संपूर्ण राज्यभरात या चोरीच्या प्रयत्नाने एकच खळबळ माजली होती. त्यामुळे चोरीच्या या प्रयत्नाचा छडा लावणे पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झाले होते. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील व त्यांच्या सहका-यांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या बीएमसीसी रोडवरील फलॅटमध्ये शिरून चोरट्यांनी काही लाखांचा ऐवज चोरून नेला होता. हा घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. मात्र, चोरीला गेलेल्या ऐवजापैकी मौल्यवान घड्याळ अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

Web Title: Pu L deshpande home thieves who stole at books were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे