पु. ल. देशपांडे, नारायण सुर्वे, विंदा करंदीकरांना ऐका!
By Admin | Published: January 7, 2016 01:41 AM2016-01-07T01:41:05+5:302016-01-07T01:41:05+5:30
आपल्या अक्षर साहित्याने मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या पु. ल. देशपांडे, कवी नारायण सुर्वे, ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर, नाटककार प्रा. वसंत कानेटकर,
पुणे : आपल्या अक्षर साहित्याने मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या पु. ल. देशपांडे, कवी नारायण सुर्वे, ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर, नाटककार प्रा. वसंत कानेटकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कवयित्री शांता शेळके, रामदास फुटाणे अशी अनेक मोठी नावे आहेत. या सर्वांनीच साहित्य संमेलनाची व्यासपीठे त्यांच्या अजोड विचारांनी गाजविली आहेत. त्यांच्या तेव्हाच्या आवाजातील अत्यंत दुर्मिळ ध्वनिफितींचे प्रक्षेपण पुणे आकाशवाणीसह राज्यातील सर्व २० उपकेंद्रांमध्ये सात जानेवारीपासून मराठी साहित्यप्रेमी रसिकांसाठी प्रक्षेपित केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची ही एक नांदीच असेल, असे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले.
आकाशवाणीकडील दिग्गज साहित्यिकांच्या आवाजातील हा दुर्मिळ ठेवा ८९ व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व २० उपकेंद्रांवर ऐकवला जाईल. या भरगच्च कार्यक्रमास सात जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत म्हणजे संमेलन संपेपर्यंत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत ते पोहोचवण्यात येणार आहे, असे नगरकर म्हणाले.