महिलांविषयक कायद्याबाबत विद्यार्थिनींमध्ये केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:05+5:302021-03-08T04:12:05+5:30

भोर : रोडरोमियोंवर वचक, अनेकांचे तुटलेले संसार जोडण्याबरोबरच सामाजिक जाणिवेतून विद्यार्थिनींमध्ये महिलांविषयक काद्याबाबात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम भोरच्या गोपनीय शाखेत ...

Public awareness among women about women's law | महिलांविषयक कायद्याबाबत विद्यार्थिनींमध्ये केली जनजागृती

महिलांविषयक कायद्याबाबत विद्यार्थिनींमध्ये केली जनजागृती

Next

भोर : रोडरोमियोंवर वचक, अनेकांचे तुटलेले संसार जोडण्याबरोबरच सामाजिक जाणिवेतून विद्यार्थिनींमध्ये महिलांविषयक काद्याबाबात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम भोरच्या गोपनीय शाखेत काम करणाऱ्या प्रमिला निकम करत आहेत. त्यांच्या कामामुळे पोलीस दलात त्यांची ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळख आहे.

प्रमिला निकमा मळूच्या सातारच्या. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्यातच झाले. पोलीस भरती कशी असते हे पाहण्यासाठी एके दिवशी त्या मैत्रिणीबरोबर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनीही परीक्षा दिली. त्यात त्यांना यश मिळाले आणि २००३ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात रूजू झाल्या. बारामती शहर, पाषाण, पुणे, राजगड पोलीस ठाणे त्यानंतर आता भोर पोलीस ठाण्यात त्या कार्यरत असून त्यांची १८ वर्षे सेवा झाली आहे.

निकम यांनी दामिनी पथकाच्या माध्यमातून स्त्यावर फिरणा-या रोडरोमियोंना चाप लावणे, गणेशोत्सव आणि मोहरम सण शांततेत पार पाडणे यांच्यासह अनेकांचे विस्कटलेले संसार जोडण्याचे काम असो की महिलाविषय विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास यामध्ये त्यांचा खारीचा वाटा नेहमीच असतो. सामाजिक दृष्टिकोन ठेवत गोरगरीब महिलांना मदत करण्याचे कामही निकम करत आहेत. दरम्यानच्या काळात भाेरमध्ये त्यांना गोपनीय विभागाची जबाबदार देण्यात आली. बहुदा ग्रामीण भागात गोपनीयमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी आहेत. आपले कर्तव्य बजावण्याबरोबर त्यांनी सामाजिक जाणिवेतून विविध शाळा, महाविद्यालयात जाऊन महिलांविषयक कायद्याची विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्याचे काम त्या करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांतून त्यांचे कौतुक होत आहे.

युवा अस्मिता वूमन्स वेलफेअरच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक लाॅकडाऊनच्या काळात तरुण मुलामुलींच्या युवा अस्मिता वूमन्स वेलफेअरच्या या ग्रुपच्या माध्यमातून प्रमिला निकम यांनी समाजप्रबोधनाचे काम केले आहे. या संघटनेमार्फत काम करताना झूम ॲपच्या माध्यमातून भोरमधील मुलांमुलींबरोबरच नाही तर इतर जिल्ह्यातील राज्यातील मुलामुलींशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी आणि कायदेविषयक योग्य ते मार्गदर्शन केले. दरम्यान, ज्यांनी हे मार्गदर्शन एकले त्यांनी तरुण मुलामुलींचे ग्रुप तयार झूम अपच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील मुला मुलींना मार्गदर्शन निकम यांनी द्यावे.

०७ भोर निकम

Web Title: Public awareness among women about women's law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.