महेश झगडेंकडे पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट अध्यक्षपदाची सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:12+5:302021-07-01T04:10:12+5:30
पुणे : पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट (पीसीजीटी) अध्यक्षपदाचा कारभार सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती सोपवण्यात आला ...
पुणे : पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट (पीसीजीटी) अध्यक्षपदाचा कारभार सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
संस्थेच्या ध्येय-धोरणानुसार व्यापक सार्वजनिक हितासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीच्या वैधानिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये तसेच कार्यक्रमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. याबाबींकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे झगडे यांनी या वेळी सांगितले. तसेच, ही संस्था शासन-प्रशासन सुधारणा करण्यासाठी सामान्य नागरिक, तरुण, सरकारी यंत्रणेचा व्यापक सहभाग करून घेण्यासाठीही आवश्यक त्या चळवळीस चालना देईल. एकंदरीतच शासन व्यवस्था ही अधिकार गाजवणारी व्यवस्था न राहता ती सेवा पुरवठादार म्हणून कसे काम करेल? या संस्कृतीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल असेही झगडे यांनी यावेळी सांगितले.
---
ट्रस्टमधील प्रमुख सदस्य
सल्लागार मंडळामध्ये मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य आयकर आयुक्त, एअर चीफ मार्शल, लष्करी जनरल अशा विविध पदांवरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.