ॲमेनिटी स्पेससंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनहित याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:06+5:302021-09-18T04:13:06+5:30
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने शहरातील ॲमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीकरिता भाडेतत्त्वावर सुरू केलेल्या हालचाली विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी ...
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने शहरातील ॲमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीकरिता भाडेतत्त्वावर सुरू केलेल्या हालचाली विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
गुरुवारी (दि. १६) ही याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्ते डॉ.सागर बालवडकर यांचे वकील ॲड. सत्या मुळे यांनी दिली आहे.
ॲमेनिटी स्पेस खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्यास त्या या जागांवर सार्वजनिक सुविधा का विकसित करतील, असा प्रश्न उपस्थित करून, या याचिकेद्वारे ॲमेनिटी स्पेसची सद्यस्थितीबाबत माहिती विचारण्यात आली आहे. सार्वजनिक सुविधांसाठी असलेल्या मिळकतीमधून चुकीच्या पद्धतीने महसूल मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही यात करण्यात आला आहे.
शहरातील आठ सामाजिक संस्थांनंतर आता ही दुसरी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्याने, शहरातील ॲमेनिटी स्पेसबाबत न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.