इंडियन मुस्लिम फ्रंन्टतर्फे शिवजयंती निमित्त जाहीर व्याख्यान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:38 PM2019-02-18T17:38:57+5:302019-02-18T17:46:38+5:30
इंडियन मुस्लिम फ्रंन्ट आणि लाेकायत संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
पुणे : इंडियन मुस्लिम फ्रंन्ट आणि लाेकायत संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी राेजी संध्याकाळी 6.30 वाजता बाबाजान दर्गाह चाैक, कॅम्प येथे हे व्याख्यान हाेणार आहे. 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस हे व्याख्यान देणार असून रयतेचे राजे शिवाजी महाराज हा या व्याख्यानाचा विषय आहे.
19 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती माेठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवाजी महाराज आज तितकेच प्रासंगिक आहेत. त्याचे कारण म्हणजे शिवाजी महाराजांचे रयतेसाठीची धाेरणे. शिवाजी महाराज यांनी कधीही जाती-धर्माच्या नावाने भेदाभेद केला नाही. त्यांनी स्त्रियांना संरक्षण दिले. त्यांना सन्मानाची वागणूक दिली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका असा आदेश आपल्या सैन्याला दिला. जमीनदारांवर जरब बसवला. शिवाजी महाराजांविषयीचा खरा इतिहास जाणून घेण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी हे व्याख्यान आयाेजित करण्यात आल्याचे आयाेजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.