सातव्या वेतन आयोगाच्या विलंबाबाबत जाहीर निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:26+5:302021-05-28T04:08:26+5:30
महापालिकेच्या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या १३ आरोग्य कोठ्यांवर सर्व सफाई कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले ...
महापालिकेच्या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या १३ आरोग्य कोठ्यांवर सर्व सफाई कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. हा वेतन आयोग दोन्ही सभागृहाने मान्य करूनदेखील महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला गेला नाही. मान्य झालेला वेतन आयोग महापालिकेच्या इमारतीमध्ये धूळ खात पडून आहे.
आमचा सातवा वेतन आयोग त्वरित शासनाच्या मंजुरीला पाठवणे व उचल म्हणून ५० हजार रुपये त्वरित महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणीदेखील कर्मचाऱ्यांनी केली आहे
पुणे महापालिकेच्या सर्व आस्थापनांतील कंत्राटी कामगारांचा दोन महिन्यांचे थकलेले वेतन त्वरित अदा करण्यात यावे, तसेच कंत्राटी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी काम न थांबवता जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विभागीय आरोग्य निरीक्षक राम सोनवणे व पुणे महापालिका कामगार युनियन कार्यालयीन चिटणीस वैजनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.