पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बदनामी करणाऱ्या अतुल खुसपेचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 05:05 PM2021-05-02T17:05:49+5:302021-05-02T18:21:26+5:30

खुसपेच्या प्रतिमेला चप्पलांचा हार घालून उजनी धरणात विसर्जन

Public protest by NCP against Atul Khobse for defaming Guardian Minister Dattatraya Bharane | पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बदनामी करणाऱ्या अतुल खुसपेचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बदनामी करणाऱ्या अतुल खुसपेचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाभुळगाव: पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याची जिवनदायीनी असलेल्या उजणी जलाशयातील सोलापूर जिल्ह्याच्या हीस्याचे पाच टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात पळविल्याचा खोटा अपप्रचार केला जात आहे. जनमानसात त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनारा करमाळा तालुक्यातील अतुल खुसपे याच्या प्रतीमेला चप्पलांचा हार घालून उजणी जलाशयाच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. तसेच अतुल खुसपे मुर्दाबादच्या घोषणा देत जाहिर निषेध केला आहे.

पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी युवक कार्यध्यक्ष गणेश भोंग,सचिन खामगळ, सतीश शिंगाडे अध्यक्ष रा.स.प, सौरभ शिंदे, यांच्यासह आनेक युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Web Title: Public protest by NCP against Atul Khobse for defaming Guardian Minister Dattatraya Bharane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.