Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:13 PM2024-11-05T16:13:04+5:302024-11-05T16:14:03+5:30

उमेदवारांनी अपक्ष अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला

Public support of these parties to Sharad Pawar group in Hadapsar Assembly Application of candidates is also behind | Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे

Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (सोमवारी) शेवटचा दिवस होता. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख समीर तुपे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नगरसेवक ॲड. अय्युब शेख तसेच सय्यदभाई यासिन यांनी अपक्ष म्हणून भरलेला आपला अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे तसेच इम्रानभाई शेख, अपक्ष उमेदवार नसीमभाभी शेख, किसन आदमाने यांनीही आपला अर्ज मागे घेत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य संघटनेने जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

विविध समाजघटकांशी संवाद

प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील सेंट पॅट्रिक टाऊन सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधला. हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तसेच परिसरात सामाजिक सलोखा जपण्यासाठी येत्या काळात काम करायचे आहे. त्यामुळे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन जगताप यांनी मतदारांना केले.

Web Title: Public support of these parties to Sharad Pawar group in Hadapsar Assembly Application of candidates is also behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.