टिकटिक वाजेना घड्याळात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 08:07 PM2018-06-28T20:07:00+5:302018-06-28T20:15:33+5:30
शहरातील कोथरूड भागातील शास्त्री नगर पोलीस चौकीजवळ काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले.
पुणे : पुणे शहरात शोभेसाठी लावण्यात आलेली घड्याळे बंद पडली असून महापालिकेचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ऐतिहासिक पुणे शहरात सजावट म्हणून महापालिकेने अनेक गोष्टी उभारल्या आहेत. मात्र त्यातील अनेक ठिकाणांची उदघाटनानंतर योग्य प्रकारे निगा राखली जात आहे. शहरातील कोथरूड भागातील शास्त्री नगर पोलीस चौकीजवळ काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले. या सुशोभीकरणात चौकात महापालिकेने लाखो रुपये खर्चून चार घड्याळ लावली होती.विविध देशांची वेळ सांगणारी ही घड्याळे अनेक लहान मुलांच्या आकर्षणाचा विषय होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित घड्याळे बंद असून ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.या कामासाठी नागरिकांनी विभागातील क्षेत्रीय कार्यालयात संपर्क केला होता
याबाबत मनसेच्या बेबी निम्हण यांनी आवाज उठवला असून महापालिकेचे इतके मोठे बजेट असताना घड्याळांची निगा का राखली जात नाही असा प्रश्न विचारला. लवकरात लवकर संबंधीत घड्याळे सुरु करण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसात ही घड्याळे दुरुस्ती झाली नाहीत तर मनसेच्यावतीने साखळी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.