‘नोड जे एस’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:58+5:302021-09-17T04:13:58+5:30
येथील राजगड ज्ञानपीठाच्या कार्यालयात राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक-अध्यक्ष अनंतराव थोपटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात ...
येथील राजगड ज्ञानपीठाच्या कार्यालयात राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक-अध्यक्ष अनंतराव थोपटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ''बी बी एस सी ए'' या पदवी अभ्यासक्रमाच्या व्दितीय व तृतीय वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमावर हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. या वेळी अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख, महाविद्यालयातील आय क्यू एस सी विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण अवघडे, संगणक विभागप्रमुख प्रशांत देशमुख, सायन्स विभागप्रमुख डॉ.पी.बी कांबळे,डॉ.बी एस कदम, प्रा.शेखर मोरे,प्रा.शिवाजी गोडावले,श्रीधर निगडे प्रा.विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा दीपाली धुमाळ यांचे काम संगणक क्षेत्रातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत अनंतराव थोपटे यांनी व्यक्त केले. राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे,सचिव डॉ.भाग्यश्री पाटील यांच्यासह प्राध्यपकांनी दिपाली धुमाळ-जाधव यांचे अभिनंदन केले.
१६ भोर पुस्तक
प्रा. दीपाली जाधव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन कराताना माजीमंत्री अनंतराव थोपटे व इतर.