एफटीआयआय’च्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त 'सिनेमा' या विषयावरच्या पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:14+5:302021-03-25T04:13:14+5:30

‘एफटीआयआय’चे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘एफटीआयआय’ने भारतीय चित्रपटाची ...

Publication of books on 'Cinema' on the occasion of FTII's Diamond Jubilee | एफटीआयआय’च्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त 'सिनेमा' या विषयावरच्या पुस्तकांचे प्रकाशन

एफटीआयआय’च्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त 'सिनेमा' या विषयावरच्या पुस्तकांचे प्रकाशन

Next

‘एफटीआयआय’चे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘एफटीआयआय’ने भारतीय चित्रपटाची माहिती, रचना, कला यांचा प्रवास हिंदी भाषेत उपलब्ध होण्यासाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली होती. मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला एफटीआयआयचे माजी अध्यक्ष बी. पी. सिंग, दिग्दर्शक श्रीराम राघवन, ध्वनिसंयोजक विश्वदीप चॅटर्जी उपस्थित होते.

एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला म्हणाले, केवळ इंग्रजी भाषेत असलेली चित्रपटाची तांत्रिक व कलात्मक माहिती भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने तीन पुस्तकांसाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. ‘एफटीआयआय’मध्ये प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची अडचण येत असल्याने ते ज्ञानापासून वंचित राहू नयेत. ही पुस्तके केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पुस्तकाचे संपादन एफटीआयआयचे माजी अधिष्ठाता अमित त्यागी व विक्रम वर्मा यांनी केले. देबजानी हल्दर यांनी संयोजन केले.

फोटो -

Web Title: Publication of books on 'Cinema' on the occasion of FTII's Diamond Jubilee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.